औरंगाबाद येथील तरुणाचा हरवलेला मोबाईल हॅन्डसेट दिला परत

 

भुसावळ, प्रतिनिधी । शुक्रवार १३ मार्च रोजी बाजार पेठ पोलीस स्टेशनला औरंगाबाद येथील एक तरुण त्याचा मोबाईल हरवल्याची तक्रार घेऊन आला होता त्यास तो मोबाईल हॅन्डसेट शोधून देण्यात आला.

 

औरंगाबाद येथील समता नगर येथील एक तरुण सकाळी ६ वाजता भुसावळ बाजार स्टेशनला आला असता त्याने सहा. पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन सांगितले की तो मुंबईवरून घरी औरंगाबाद येथे जात असतांना त्याचा व्हिओ कंपनीचा मोबाईल हँडसेट बस स्टॅन्ड येथे कुठेतरी पडून हरवला आहे. लागलीच सहा पो निरीक्षक संदीप परदेशी याची दखल घेऊन त्या तरुणासह पो.हे.काॅ शंकर पाटील,पो.ना.रविद्र बिर्हाडे, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, पो.काॅ विकास सातदिवे, श्रीकृष्णा देशमुख, दिनेश कापडणे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, किशोर मोरे असे बस स्टॅन्ड भागात मोबाईल चा शोध घेण्यासाठी गेले. दरम्यान, मोबाईल रेल्वे स्टेशन पोलिस चौकी शेजारी दुध विक्री दुकानदार भुरा भाई यांना तो मोबाईल हॅन्डसेट रेल्वे स्टेशन परीसरात सापडला असता त्यांनी मोबाईल हॅन्डसेट पो.काॅ दिनेश कापडणे व प्रशांत परदेशी यांना दिला. पोलीस स्टेशन येउन सदर युवक मोबाईल मालक यांना दिला.त्या युवक ने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

Protected Content