कोरोना लॉकडाऊन : धरणगावातील ‘त्या’ दोघं पेट्रोल पंपांवर कारवाई करणार : प्रांतधिकारी

धरणगाव (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यां व्यतिरिक्त इतरांना बेकायदेशीर डीझेल, पेट्रोल विक्री आणि महसूलने पास देऊन पेट्रोल न देणाऱ्या दोन वेगवेळ्या पेट्रोल पंपांच्या संदर्भात ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ने वृत्त प्रकाशित केले होते. संबंधित दोघं पेट्रोल पंपांवर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांनाच डीझेल, पेट्रोल देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. यासाठी संबंधितांना पासेस देखील देण्यात आल्या आहेत. परंतू धरणगावात शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नोबल पेट्रोल पंपावर बेकायदेशीररित्या पेट्रोल,डीझेलची सर्रास विक्री सुरु होती याचा व्हिडीओ ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ कडे एका प्रेक्षकाने पाठवला होता. तर दुसऱ्या प्रकरणात शहरातील दुध विक्रेत्यांना आज चक्क धरणगाव महसूल विभागाने दिलेल्या पासेस नाकारत पेट्रोल देण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार धरणगावातील किकाभाई ॲण्ड सन्स पेट्रोलपंपावर घडला होत. दुध संघटनेचे प्रमुख धीरेंद्र पुरभे यांनी याबाबत महसूल कर्मचारी गणेश पवार यांना फोन लावून आपली तक्रार सांगितली होती. श्री. पवार यांनी पेट्रोलपंप चालकाशी बोलून पेट्रोल देण्याच्या सूचना केल्या. परंतू तरी देखील पेट्रोल पंप चालकाने पेट्रोल देण्यास नकार दिला होता.

 

दरम्यान, या संदर्भात आज प्रांतधिकारी विनय गोसावी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्यांनी सांगितले की, दोघं पंपांवर निश्चित कारवाई केली जाईल. तूर्त आमच्या समोर कोरोनचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान आहे. योग्य वेळी निश्चित माहिती घेऊन कारवाई करू, असे त्यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलतांना सांगितले.

Protected Content