महिलेचा पाठलाग करून विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेचा पाठलाग करून महात्मा गांधी उद्यान येथे अश्लील वक्तव्य करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील एका भागात महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्या शहरातील एका संस्थेत नोकरीला आहे. सप्टेंबर २०२३ रोजी पासून संशयित आरोपी रवींद्र गांगुर्डे रा. धरणगाव हा महिलेच्या पाठलाग करून वेळोवेळी अश्लील चाळे करत होता. दरम्यान धरणगाव शहरातील महात्मा गांधी उद्यान जवळ बुधवार ६ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता महिलेचा पाठलाग करून अश्लील वक्तव्य करत संशयित आरोपी रवींद्र गांगुर्डे याने महिलेचा विनयभंग केला. तसेच तिच्या मुलाला दमदाटी करत मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने नजीकच्या धरणगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्यानुसार संशयित आरोपी रवींद्र गांगुर्डे यांच्या विरोधात बुधवार ६ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जनार्दन पाटील हे करीत आहे.

Protected Content