Home राजकीय कोरोनाचा असाही इफेक्ट : ११ हजार कैदी पॅरोलवर सुटणार !

कोरोनाचा असाही इफेक्ट : ११ हजार कैदी पॅरोलवर सुटणार !

0
32

मुंबई प्रतिनिधी । कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असतांना आता राज्यातील ११ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील तुरुंगांतील गर्दी कमी करण्यासाठी ११ हजार आरोपी आणि गुन्हेगारांची तातडीने परोलवर सुटका करण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत. याच्या अंतर्गत सात वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळजवळ ११ हजार आरोपी किंवा गुन्हेगारांना तातडीने परोल देण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आठवडाभरात यावर कार्यवाही व्हावी, अशाही सूचना दिल्या गेल्या असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound