कोरोना: भुसावळातील ४७ भाविक अडकले मध्यप्रदेश सीमेवर (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । उत्तर प्रदेश येथे तीन धाम यात्रेसाठी गेलेल्या भुसावळातील ४७ भाविक मध्यप्रदेश सीमेवर अडकले आहे. त्यांची सुटका व्हावी अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील ४७ भाविक रेल्वेद्वारे तीन धाम यात्रेसाठी गेले होते. मात्र राज्यात २२ मार्चपासून रेल्वे बंद झाल्याने हे भाविक पुढील यात्रा रद्द करत खाजगी बसद्वारे भुसावळकडे परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढत असल्याने देशभरातील राज्य सीमा बंद करण्यात आले आहे. त्यामुळे इलाहाबादवरून भुसावळकडे येत असताना या भाविकांची बस मध्यप्रदेश सीमेवर रोखण्यात आली आहे.

गेले दोन दिवसापासून हे भाविक ज्या मध्यप्रदेश सीमेवर अडकून पडले आहे. तो जंगली भाग असून जवळच असलेल्या एका छोट्या रेल्वेस्थानकावर एक रात्र या भाविकांनी काढली. मात्र रेल्वे पोलिसांनी तिथून त्यांना हाकलून लावल्याने आता हे भाविक रस्त्यावर आले आहे. तसेच जवळील असलेल्या खाण्याच्या साहित्यावर भाविकांनी दोन दिवस काढले. मात्र आता हे साहित्य संपत आल्याने खाण्याचे सुद्धा हाल होत आहे. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कडून आमची सुटका करण्याची याचना हे भाविक करत आहेत.

Protected Content