कुटीर रुग्णालयामध्ये बाहेरगावाहून आलेल्यांची तपासणीसाठी गर्दी

पारोळा, प्रतिनिधी । तालुक्यातील कुटीर रुग्णालयात १० बेडचे आयसोलेटेड वॉर्ड तयार करण्यात आला असून, त्यात गंभीर रुग्ण आल्यास त्याची तपासणी या ठिकाणी होऊ शकेल असे नियोजन आहे. दरम्यान, बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांची येथे तपासणीसाठी गर्दी होत असल्याचे दृश्य दिसत आहे.

पारोळा तालुक्यात परदेशातून आतापर्यंत चार नागरिक दाखल झाले आहेत. तर २५० च्या वर मुंबई, पुणे येथून नागरिक परतले आहेत. या शहरात फिलिपाईन्सवरून एक जण परतला आहे. तर दुबई येथून टोळी, कराड व तामसवाडी येथे प्रत्येकी एक जण परतला आहे. या सर्वांची वैद्यकीय पथकाने तपासणी केली आहे. त्यात कोरोनाबाबत कोणतीही लक्षणे दिसून आली नाही. त्यांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत १४ दिवस निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) राहण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. तालुक्यात एकही बाधित नाही. कुटीर रुग्णालयात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येत आहे . काही लक्षणे दिसून आली तर त्यांना पुढील वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे जाण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच पारोळा कुटीर रुग्णालय १० आइसोलेटेड बार्डची उभारणी केली आहे. परदेशातून आलेल्या चार रुग्णांवर लक्ष ठेवत आहेत. कोरोनासाठी इंटिलेटावरसह पुरेशी साधनसामुग्री नाही. डॉ.योगेश साळुंखे, वैद्यकीय अधिकारी, कुटीर रुग्णालय, पारोळा यांनी पत्रकारांना दिली माहिती.

Protected Content