भुसावळात कोरोनाचा पार्श्वभूमीवर उपविभागीय समितीची स्थापना 

भुसावळ प्रतिनिधी । कोरीना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली  23 मार्च सोमवार रोजी उपविभागीय कार्यालयात तालुकास्तरीय उपविभागीय समितीची स्थापना करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, कोरीना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मा.प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यासाठी बैठकीचे आयोजन दिनांक 23 मार्च सोमवार रोजी सायंकाळी 5.00 वाजेला करण्यात आले होते. यामध्ये उपविभागीय समितीची मा. प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने यांच्या अध्यक्षतेखाली मा.तहसिलदार दिपक धिवरे,बी.डी.ओ, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुका पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी, वरणगाव नगरपालिकेचे दोन प्रतिनिधी असे पदाधिकारी बैठकीला उपस्थित असून स्थापना करण्यात आली.

कोरीना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी समिती तालुकास्तरावर उपाय-योजना तसेच दैनंदिन आढावा घेऊन जिल्ह्या परिषदेकडे सोपविणार आहे.तसेच बी.डी.ओ.ग्रामपातळीवर समिती स्थापन करणार तसेच अध्यक्षपदी सरपंच पदभार सांभाळणार या समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक,आरोग्य अधिकारी, सभापती, पोलीस पाटील यांचा समावेश असणार आहे. समिती कोरीना बद्दल माहिती संकलन करून पोलीस स्टेशन व तहसिल कार्यालयाकडे जमा करावी लागणार आहे. या दरम्यान जर एखादा कोरोना लागण रुग्ण आढळल्यास तो उपचारासाठी जाण्यास नकार दिल्यास वैद्यकीय अधिकारी पोलीस बंदोबस्तात रुग्णाला जिल्ह्या रुग्णालयात घेऊन जाणार आहे. तसेच जिल्ह्या बंदी असल्याने बाहेर जिल्ह्यातील दुसरा व्यक्ती येऊ शकणार नाही तसेच दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकणार नाही. यासाठी परिवहन विभागाकडे जबाबदारी (आर.टी.ओ) सोपविण्यात आली आहे. नगरपरिषद तसेच पोलीस प्रशासन शासनाकडून आलेले निर्णय वाहनाने स्पीकरव्दारे अलाऊन्समेंट करून जनजागृती करणार आहे.जीवनावश्यक वस्तूचा साठा करू नये जेणे करून त्या खराब झाक्यास फेकण्याची वेळ येत कामा नये. साठाकेल्यास दुसऱ्यांना मिळणार नाही याची काळजी घ्यावी. अशी माहिती मा.प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने यांनी दिली.

Protected Content