मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी शिवराजसिंह चौहान

भोपाळ वृत्तसंस्था । भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चौथ्यांदा एका साध्या समारंभात शपथ घेतली.

सोमवारी भाजपच्या बैठकीत शिवराज सिंह चौहान यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली. भाजप प्रदेश मुख्यालयात पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष विष्णुदत्त शर्मा यांनी गटनेत्यासाठी आमदारांना आमंत्रित केलं. यावेळी, गोपाल भार्गव यांनी शिवराज सिंह चौहान यांच्या नावाचा प्रस्ताव समोर ठेवला. या प्रस्तावाला सर्व आमदारांनी समर्थन दिले. यानंतर त्यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

आपण मध्य प्रदेशच्या विकासासाठी काम करणार असून सध्या कोविड १९ चा प्रसार रोखणं हाच उद्देश आहे. त्यामुळे, या शपथग्रहण सोहळा साजरा न करण्याची विनंती मी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलीय. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरू नये. कार्यकर्त्यांनी घरीच राहून नव्या सरकारसाठी प्रार्थना करावीफ असं शिवराज सिंह यांनी गटनेतेपदी निवड झाल्यानंतर म्हटले आहे.

Protected Content