Home क्राईम छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला ; १४ जवान जखमी

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला ; १४ जवान जखमी

Naxals killed teacher in gadchiroli fear in the localities
Naxals killed teacher in gadchiroli fear in the localities

छत्तीसगड (वृत्तसंस्था) सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा पोलीस स्टेशन अंर्तगत असणाऱ्या बुर्कापाल जंगलात नक्षलवाद्यांनी अचानक कोंबिंग ऑपरेशनमध्ये असणाऱ्या 150 जवानांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात १४ जवान जखमी तर १३ बेपत्ता आहेत. दरम्यान, या चकमकीत पाच नक्षलवादीही ठार झाले आहेत.

पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक तासभर सुरु होती. पोलीस दलावर वाढता दबाव पाहून पोलिसांनी जिल्हा मुख्यालयी संपर्क साधला. त्यानंतर थोड्या वेळात घटनास्थळी पोलिसांचे हेलिकॉप्टर दाखल झाले. हवेत हेलिकॉप्टर बघताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात 14 जवान जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती नाजूक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सर्व जखमी जवानांवर रायपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


Protected Content

Play sound