कोव्हीड-१९ : कोरोना से ‘डरो ना’ ! ( Blog )

मित्रांनो, आज आपण पाहात आहोत आपल्या अवतीभवती सगळीकडे एकच शब्द ऐकायला येत आहे. तो म्हणजे कोरोना. आजवर कोरोना म्हणजे काय? हे सर्वांनाच माहित झाले आहे. परंतु त्याबाबत काही गैरसमज देखील आहेत. कोरोना हा आजार खरंच खूप भयंकर आहे का हो? खरंच त्याला आपण इतके घाबरले पाहिजे का? आज आपण या लेखातून कोरोनाचे सर्व समज गैरसमज यावर एक प्रकाश टाकूया व त्याबद्दल माहिती घेऊया.

कोरोना म्हणजे काय?

कोरोना हा एक अशा प्रकारच्या विषाणू आहे की ज्यामुळे व्यक्तीमध्ये खोकला येणे, ताप येणे, श्‍वासोच्छवासाला त्रास होणे अशा प्रकारचे लक्षणे दिसून येतात. हा विषाणू २०१९ मध्ये आढळून आला म्हणून याला आता (कोव्हीड-१९) असे नवीन नाव देण्यात आले आहे. या विषाणूपासून होणार्‍या रोगाची सुरुवात चीनच्या वुहान या शहरात झाली. ३१ डिसेंबर २०१९ रोजी या रोगाचा पहिला रुग्ण आढळून आला.

संसर्गापासून कसे सावध राहाल?

आपले हात वारंवार धुवा.

नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवा. आपले हात स्वच्छ धुतल्यामुळे हातावर असलेले विषाणू नष्ट होतात.

परस्परांमध्ये अंतर ठेवा.

खोकला किंवा शिंका येत असलेल्या व्यक्तींमध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीत कमी एक मीटर अंतर ठेवा. यामुळे आपले समाजिक जीवन सुरक्षित होईल.

डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा.
बर्‍याच वेळा आपण कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श करतो व त्याच हातांनी आपल्या डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला स्पर्श करतो यामुळे आपल्या हातावर असलेले विषाणू डोळे, नाक व तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करु शकतात.

श्‍वसन करतांना स्वच्छता पाळा.

आपण आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना श्‍वसनाच्या चांगल्या स्वच्छतेची सवय लावून घ्या. याचा अर्थ असा की जेव्हा आपण खोकतो किंवा शिंकतो तेव्हा आपले नाक व तोंड हातरुमालने झाका. कारण आपण जेव्हा खोकतो तेव्हा आपल्या शरीरातून थेंब बाहेर पडतात त्यातून विषाणूंचा प्रसार होऊ शकतो व आपल्या अवतीभवती असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर जर आपल्याला ताप, खोकला असेल आणि श्‍वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.

समज-गैरसमज.

कोरोना विषाणू उष्ण आणि दमट हवामान असलेल्या भागात संक्रमित होऊ शकतो का?
होय, आत्तापर्यंतचा पुराव्यांवरून हे लक्षात आले आहे की हा विषाणू उष्ण आणि दमट हवामान असलेल्या क्षेत्रासह सर्व क्षेत्रात संक्रमित होऊ शकतो. यापेक्षा हवामानाचा विचार न करता आपण राहत असलेल्या ठिकाणी संरक्षणात्मक उपायांचा अवलंब करा.

थंड हवामानात कोरोना नष्ट होत नाही का?

असे मानण्याचे कोणतेही कारण नाही की, थंड हवामान असलेल्या ठिकाणी कोरोना विषाणू नष्ट होत नाही. थंड हवामान नवीन कोरोनासह इतर रोगांचाही नाश करू शकते कारण तापमान किंवा हवामान याची पर्वा न करता मानवी शरीराचे सामान्य तापमान ५ डिग्री सेल्सियस ते ३७ डिग्री सेल्सियस पर्यंत असते.

अतिगरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे संरक्षण मिळेल का?

अतिगरम पाण्याने अंघोळ केल्याने कोरोना विषाणूपासून संरक्षण मिळू शकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सियस पर्यंतच राहिल. याउलट अत्यंत गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्याला जळजळ होऊ शकते.

नवीन कोरोना विषाणू डासांच्या दंशामुळे प्रसारित होऊ शकतो का?
कोरोना विषाणू डासांद्वारे संक्रमित केला जाऊ शकतो की, नाही याचा शोध अद्याप सुरू आहे. याची कोणतीही माहिती किंवा पुरावा अद्याप उपलब्ध नाही. कोरोना हा एक विषाणू आहे जो प्रामुख्याने एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे खोकला किंवा शिंक यातून प्रसारित होत आहे.

संसर्ग झालेल्यांना शोधण्यासाठी थर्मल स्कॅनर प्रभावी आहेत का?

होय, थर्मल स्कॅनर प्रभावी आहेत कारण शरीराच्या तापमानापेक्षा तापमान जास्त आहे हे शोधण्यासाठी थर्मल स्कॅनर प्रभावी आहेत. परंतु थर्मल स्कॅनरद्वारे आपण संक्रमित लोकांना शोधू शकत नाही. याचे कारण असे की लोक आजारी पडतात व ताप येण्यापूर्वी २ ते १० दिवसांच्या कालावधी लागतो.

कोणत्या वयोगटातील लोक संक्रमित होऊ शकतात?

सर्व वयोगटातील लोकांना हा विषाणू संक्रमित करू शकतो. ज्या व्यक्तींना दमा, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या समस्या आहेत त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

याला रोखण्यासाठी किंवा त्यावर उपचार म्हणून काही विशिष्ट औषधी आहेत का?

आजपर्यंत कोरोना विषाणू टाळण्यासाठी किंवा त्यावर उपचार म्हणून कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाही. यासाठी संशोधन सुरू आहे.

कोरोना संसर्ग झाल्यास मृत्यू होतो का?

कोरोना संसर्ग झाल्यास माणसाच्या मृत्यू होईलच असे नाही, यावर वेळेवर योग्य उपचार केल्यास या आजारातून बरे होता येते.

कोरोनाची प्रमुख लक्षणे.

ताप येणे, सर्दी, खोकला, घशात खवखवणे, श्‍वसनाला अति त्रास होणे आदी.

आज आपण सगळे व्हाट्सअप, फेसबूक यांसारखे सोशल मिडीया प्लॅटफॉर्म वापरत असतो. यांद्वारे आपण पाहतो की, अनेक प्रकारची माहिती आपल्याला घरबसल्या मिळते. परंतु ही माहिती खरी आहे का हो? याची शहानिशा न करता आपण क्षणाचा विलंब न करता ती माहिती पुढे पाठवत असतो असेच कोरोना विषयी झाले आहे. आजच्या या लेखातून आपल्याला कोरोना विषयी माहिती मिळाली असेलच तरीही मित्रांनो आपण समाजाचे एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे की, चांगली माहिती पुढे जरूर पाठवा. परंतु अफवांवर विश्‍वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कोरोनावर सर्वात चांगला उपाय म्हणजे आपले हात वारंवार साबणाने धुऊन स्वच्छ करावे तसेच अनावश्यक ठिकाणी स्पर्श करु नये. खोकताना, शिंकताना तोंड व नाकासमोर रुमाल धरावा यामुळे आपले स्वतःचे आणि आपले सामाजिक आरोग्य चांगले राहील.

संदर्भ- जागतिक आरोग्य संघटनेद्वारे जारी करण्यात आलेली माहिती

– भूषण सुरेश महाले
उपशिक्षक लोकमान्य विद्यालय,अमळनेर
bhushan mahale amalner

Protected Content