पुन्हा मंद वेग : जळगावात दोन तर जिल्ह्यात २१ ठिकाणीच लसीकरण !

जळगाव प्रतिनिधी। लसींची उपलब्धता मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आज जळगाव शहरात दोन तर जिल्ह्यात २१ ठिकाणीच लसीकरण होणार आहे.

जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी सज्ज तयारी केली असून आता लवकरच खासगी डॉक्टर्सकडेही लसी उपलब्ध होणार आहेत. तथापि, लसीच उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत. सध्या जळगाव शहरासह जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे केवळ १७०० डोसच शिल्लक आहेत. त्यातील ६०० डोस जळगाव शहरात असून १५०० डोस जिल्हाभरात आहेत. जिल्ह्यात २१ केंद्रांवर आज ४५ वर्षांवरील लाभार्थींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल.

जिल्ह्यात सोमवारसाठी १०२०कोविशिल्ड तर ६८० कोव्हॅक्सिनचे डोस शिल्लक आहेत. ज्या केंद्रावर लससाठा असेल तेथेच लस टोचली जाणार आहे. जळगाव शहरात महापालिकेचे छत्रपती शाहू महाराज रूग्णालय आणि शिवाजीनगरातील डी. बी. जैन रूग्णालय या दोन ठिकाणीच लसीकरण होणार आहे. तर जिल्ह्यात फक्त २१ ठिकाणी लसीकरण होईल.

जळगाव जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची यादी पुढीलप्रमाणे आहे.-

भुसावळ रेल्वे हॉस्पिटल १०० कोव्हॅक्सिन, जामनेर ५० कोव्हॅक्सिन, मुक्ताईनगर १० कोव्हॅक्सिन, रावेर ३० कोविशिल्ड, यावल ३० कोव्हॅक्सिन, बोदवड १० कोव्हॅक्सिन, न्हावी १०० कोव्हॅक्सिन, सावदा ४० कोविशिल्ड, वरणगाव १० कोविशिल्ड, दीपनगर २० कोविशिल्ड, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव १५० कोविशिल्ड, असा साठा आहे.

 

 

 

 

Jalgaon Corona Vaccination Availability On 17 May 2021

 

Protected Content