Home Cities जामनेर पहूर येथे अवकाळी पावसाचा तडाखा !

पहूर येथे अवकाळी पावसाचा तडाखा !


पहूर, ता.जामनेर (प्रतिनिधी) ऐकीकडे कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत असतांना दुसरीकडे पहूर येथे आज दुपारी जोरदार पाऊस झाला. पाऊस साधारण अर्धातास सुरू होता.

आज दुपारी चार वाजेच्या सुमारस अचानक आभाळ भरून आले. त्यानंतर साडेचार वाजेच्या सुमारस अचानक बेमोसमी पाऊस सुरू झाला. या अचानक अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हिरावतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


Protected Content

Play sound