Home आरोग्य राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ३८ वर पोहचली !

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ३८ वर पोहचली !


मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत आणखी ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ३८ वर पोहचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की, महाराष्ट्रात अजून चार जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामधील तिघे मुंबईतील तर एक नवी मुंबईतील आहे. यामधील दोन जण कुटुंबाच्या संपर्कात आले तर इतर दोघेजण परदेशात प्रवास करुन आलेले आहेत. पनवेलमधील विलगीकरण कक्षात ३३ जणांना ठेवण्यात आले असल्याची माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. पण, आकडा वाढला आहे.


Protected Content

Play sound