मध्य प्रदेशात बहुमताची चाचणी तात्काळ घेण्यात यावी ; भाजपने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव

भोपाळ (वृत्तसंस्था) बहुमत चाचणीवरून विधानसभेत झालेल्या गोंधळामुळे सभापतींनी विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित केली. परंतू बहुमताची चाचणी तात्काळ घेण्यात यावी, या मागणीसाठी भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

विधानसभेच्या अध्यक्षांनी विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित केल्याचे जाहीर केल्याने आता कमलनाथ सरकारला बहुमत चाचणी घेण्यासाठी १० दिवसांचा वेळ मिळाल आहे. परंतू मध्य प्रदेश विधानसभा २६ मार्चपर्यंत का स्थगित केली? , याचे कारण कोरोना आहे की आणखी काही याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता विधासनभा २७ मार्चला सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. दरम्यान, भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान बहुमत चाचणीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायलाने लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्याचे द्यावेत आदेश, अशी मागणी शिवराजसिंह यांनी केली आहे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह १९ आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यामुळे कमलनाथ सरकारवर संकट ओढवले आहे.

Protected Content