मुंबईचा पुढील महापौर भाजपचाच ! : अमित शाह

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत पक्षाच्या बैठकीत आगामी निवडणुकीनंतर मुंबईत भाजपचाच महापौर असेल असा दावा केला आहे.

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौर्‍यावर आले आहेत. या दौर्‍यादरम्यान शाहांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शिवसेनेने आमच्या पाठित खंजीर खुपसला असून, स्वत:च्या निर्णयामुळे शिवसेना छोटी झाल्याचे ते म्हणाले. केवळ दोन जागांसाठी शिवसेने युती तोडल्याचेही शहा यांनी यावेळी सांगितले. उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली असून, बीएमसीसाठी भाजपचं १५० जागांचं टार्गेट असल्याचेही  अमित शाह म्हणाले.

 

अमित शाह यांनी आजच्या दौर्‍याच्या माध्यमातून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे. यात ते शिंदे गटाला सोबत घेऊन निवडणूक लढविणार की नाही ? याबाबत मात्र त्यांनी काहीही वक्तव्य केले नाही. अर्थात, एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

Protected Content