राष्ट्रवादीत विलीन होणार ठाकरे गट ! : निलेश राणेंचा दावा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ठाकरे गटावर जोरदार टिका करणारे भाजप नेते निलेश राणे यांनी आज एक अजब दावा केला आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार निलेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर जोरदार टिका केली. ते म्हणाले की, ठाकरे यांचा गट येत्या १९ जूनला मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये मेळावा घेणार आहे. हा मेळावा नियमबाह्य आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून घेतला जाणारा मेळावा अधिकृत आहे.

 

उद्धव ठाकरे गटाचा, जे काय त्यांना तात्पुरते नाव मिळाले होते- शिवसेना उबाठा, याची स्थापना दहा ऑक्टोबर २०२२ रोजी झालेली आहे. त्यामुळे १९ जूनला शिवसेनेचा नावाने हे मेळावा घेऊ शकत नाहीत आणि असा जर मेळावा त्यांनी घेतला तर त्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाऊ शकते असा दावा राणे यांनी केला. यामुळे १९ जून रोजी ठाकरे गटाला राष्ट्रवादीत विलीनीकरणाशिवाय दुसरा मार्ग नसेल असे ते म्हणाले.

 

निलेश राणे पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी देशाला महासत्तेच्या दिशेने नेले आहे, हे राऊतांसारख्या राजकीय दलालाला कधी कळणार नाही. तुम्ही म्हणता कायदा कोठ्यावर नाचतो. अशी भाषा तुम्हीच करू शकता. कारण, आरेच्या गेस्ट हाऊसमध्ये कोण कुठे नाचत होते, तुम्हाला माहित आहे. तुमच्या मालकाचा मुलगा महाविकास आघाडीच्या काळात रोज संध्याकाळी साडेसातनंतर डिनो मोरियाच्या घरी कोणाकोणाला नाचवायचा, किती अधिकारी नाचायचे, हे पण जरा सांगा असे राणे म्हणाले.

Protected Content