पुणे (वृत्तसंस्था) किरकोळ वादातून १६ वर्षीय मुलाला एका टोळक्याने नग्न करून कोयत्यासह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मुलगा बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या तोंडावर टोळक्याने मुत्रविसर्जन केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर परिसरात घडला आहे.
१२ मार्च रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरच्यांना सांगून गेलेल्या पिडीत मुलाला एकमेकांकडे पाहण्याच्या कारणातून झालेल्या वादानंतर विनीत सूर्यकांत बिरादार (वय, १९ रा. भेकराईनगर), शुभम राजाभाऊ जाधव (वय १९ रा.समर्थ नगर पिंपरी-चिंचवड) देविदास ऊर्फ देवा घनशाम पाहणे (वय, २१, रा. काळेपडळ हडपसर ) भारत विशाल राठोड (वय, २१ रा. कुंजीर वस्ती ) सलीम कलिंदर शेख (वय, २२ रा.घुले वस्ती मांजरी ) या पाच जणांनी बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे, तर तो बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या तोंडावर लघुशंका देखील केली. याप्रकरणी पिडीत मुलाच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.