मनवेल येथील तरूणाने संपविले जीवन !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मनवेल येथील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील मनवेल येथील रहिवाशी जयदीप गुलाब पाटील (वय-२१) या तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. घरातील सर्व सदस्य हे शेतात कामाला गेले होते. दुपारी आईवडील घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. मयत जयदीपच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content