मुंबई (वृत्तसंस्था) रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर छापे टाकले. गेल्या १२ तासांपासून ईडी चौकशी करत असून ईडीने राणा कपूर यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे.
ईडीने शुक्रवारी संध्याकाळी राणा कपूर यांच्या वरळी येथील घरावर छापे टाकले. डीएचएलएफला कर्ज दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. येस बँकेने डीएचएलएफला तब्बल ३६०० कोटींचे कर्ज देऊन फायदा घेतल्याचा आरोप राणा यांच्यावर आहे. राणा कपूर यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन हजारो कोटी रुपये परदेशात पाठवले असा आरोप त्यांच्यावर आहे.