पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मणशेवगा येथील माहेर असलेल्या विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावे, या मागणीसाठी मानसिक त्रास देऊन छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उज्वला विक्रांत पाटील (वय-२७)  रा. ब्राह्मणशेवगा ता. चाळीसगाव यांचा विवाह जळगावातील विक्रांत अनिल पाटील यांच्याशी झाला. लग्नानंतर विवाहितेला घर घेण्यासाठी बाहेरून ५ लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेच्या आई-वडिलांची परिस्थिती नाजूक असल्याकारणामुळे त्यांनी पैसे आणले नाही. म्हणून तिला मारहाण करत शारीरिक व मानसिक त्रास दिला, तसेच सासू-सासरे यांनी देखील त्रास दिला, हा छळ सहन न झाल्याने अखेर त्यांनी माहेर गाठले. त्यानंतर मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेला तक्रारीवरून पती विक्रांत अनिल पाटील, सासू निर्मल अनिल पाटील,  जीज सासू मंगल धर्मा पाटील आणि जीज सासरे धर्मा पाटील रा. आयोध्या नगर यांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अशोक राठोड करत आहे.

Protected Content