पतीस मारहाण करीत महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावली

ramdev wadi

जळगाव प्रतिनिधी । शिरसोली येथून वावडदा मार्गे उत्राण येथे दुचाकीने जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण करून पत्नीच्या अंगावरील दागीने ओरबडून नेल्याची घटना दुपारी रामटेकडीजवळ घडली. या हाणामारीत पती गंभीर जखमी झाला. जखमीस म्हसावद ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप काशिनाथ पाटील (वय-30) रा. उत्राण ता. एरंडोल हे आपल्या पत्नी नेहा दिलीप पाटील (वय-26) सह शिरसोलीकडून वावडदामार्गे उत्राण येथे जाण्यासाठी दुपारी 4 वाजेच्या सुमारास शिरसोली रामटेकडी रस्त्यादरम्यान असलेल्या तलावाजवळ आले असता. दिलीप पाटील यांना लघुशंका जाण्यासाठी दुचाकी रस्त्यावर थांबविली. त्यावेळी पत्नी नेहा ह्या दुचाकीजवळ उभ्या होत्या. त्याचवेळी अज्ञात चार जणांनी महिलेजवळ आल्यानंतर त्यांनी गळ्यातील गळ्यातील १७ ग्राम वजनाची सोन्याची पोत लांबवून ओढून घेतली. हा प्रकार होत असतांना पती दिलीप यांच्या लक्षात आल्यानंतर ते चौघांवर धावून आले. या झटापतील चौघांनी दिलीप पाटील यांना उचलून बाजूला आलेल्या जंगलात नेवून जबर मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर तेथून फरार झाले. हा प्रकार होत असतांना नेहा पाटील यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना थांबवून प्रकार सांगितला. यातील दुचाकीस्वार जितेंद्र जैसवाल यांनी दुचाकी थांबवून महिलेला मदत केली. त्यांनी तातडीने म्हसावद येथील ग्रामीण रूग्णालयात उचारार्थ दाखल केले. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Protected Content