राज्यभरात अवकाळी पावसाची हजेरी !

औरंगाबाद (वृत्तसंस्था) राज्यभरात शनिवारी नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, जालना या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.

 

पूर्वेकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि मध्य-पूर्व अरबी समुद्रातील चक्रवाती स्थिती यामुळे राज्यात शनिवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला. नाशिक तसेच औरंगाबाद जिल्ह्यात या पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात एक आणि दोन मार्चला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यातील काही भागात गारपीट झाली आहे. पावसासोबत मोठ्या गारा कोसळल्या. यामुळे पिकाच्या नुकसानीची भीती आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले. विशेष करुन द्राक्ष उत्पादक आणि ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांना याचा मोठा तडाखा बसला आहे.

Protected Content