लिपीक आता महसूल सहाय्यक म्हणून ओळखले जाणार !

मुंबई । लिपीक या पदाला आता नवीन ओळख मिळाली असून महसूल खात्यात लिपीकाला आता महसूल सहाय्यक म्हणून ओळखले जाणार असून आज ना. बाळासाहेब थोरात यांनी याबाबतची घोषणा केली. महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची राज्यातील महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील ङ्गलिपिक गट कङ्घ कर्मचार्‍यांची तांत्रिक लिपिक ऐवजी महसूल सहायक असे पदनाम करावे अशी मागणी होती. राज्य शासनाने महसूल कर्मचारी संघटनेची ही मागणी मान्य केली आहे. अर्थात, कर्मचार्‍यांना पदनाम बदलामुळे शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

Protected Content