संजय ब्राह्मणे वंचित बहुजन आघाडी कडून रावेरच्या रिंगणात !

भुसावळ-इकबाल खान | शिवसेना-उबाठा पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय पंडित ब्राह्मणे यांना वंचित बहुजन आघाडीने रावेर लोकसभा मतदारसंघातून तिकिट जाहीर केले असून यामुळे रावेरातील लढत तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भुसावळ विधानसभा मतदारसंघातून संजय पंडित ब्राह्मणे यांनी २०१४ साली शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना अपयश आले होते. यानंतर ते अलीकडच्या काळात पुन्हा एकदा शिवसेना-उबाठा पक्षाच्या माध्यमातून सक्रीय झाले होते. या पार्श्‍वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीने त्यांना रावेरमधून उमेदवारी जाहीर केली आहे.

संजय ब्राह्मणे हे उच्चशिक्षित ( बी. ई सिव्हील ) असून मोठे कंत्राटदार म्हणून त्यांची ख्याती आहे. मूळचे धुळेकर असणारे ब्राह्मणे हे सध्या भुसावळात वास्तव्यास आहेत. ते स्वत: आंबेडकरी समाजातील मान्यवर व्यक्तीमत्व असून त्यांच्या माध्यमातून रावेरात वंचितने मोठा डाव टाकल्याचे मानले जात आहे.

Protected Content