गुजरातमध्ये ४ भाविकांचा अपघाती मृत्यू !

Accident

वडोदरा (वृत्तसंस्था) गुजरातमधील कुबेर भंडारी मंदिरात दर्शन परतणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील चार भाविकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. नंदकिशोर संपत, किशोर कोल्हे, गोरख घोरपडे आणि प्रवीण शिरसाठ अशी अपघात मृत झालेल्यांची नावे आहेत.

अपघातात मृत्यू पावलेले चौघं जण शनिवारी दुपारी पिंपरी निर्मळ येथून इर्टीका मोटारीने (एम.एच.१७, ए झेड.-४५७) गुजरात येथील कुबेर या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी गेलेले होते. दर्शनावरुन रविवारी दुपारी परतीच्या प्रवासात असताना नर्मदा शहरानजीक ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येणाऱ्या मालवाहू ट्रकसोबत त्यांची समोरासमोर धडक झाली. त्यात दोघांचा जागीच तर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Protected Content