संस्था स्थापन करून देण्याच्या नावाखाली 11 लाखाची फसवणूक; पोलीसात गुन्हा

fraud

जळगाव प्रतिनिधी । संस्था स्थापन करून देण्याच्या बहाण्याने सभासदांकडून प्रत्येक 400 रूपये घेवून सुमारे 11 लाख 20 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जण व इतर साथीदारांवर जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, निता संजय बारी रा. गणेश कॉलनी, ख्वाजामिया नगर ह्या प्रज्ञा संजीवनी फाऊंडेशनच्या प्रमुख आहेत. संस्था स्थापन करून देते असे सांगून संशयित आरोपी वैशाली श्यामकुमार सोळकी, भानूदास शिवाजी पवार रा.दत्ता कॉलनी, शाहुनगर इतर साथीदार यांनी फाऊंडेशच्या किमान दोन हजारहून अधिक सभासदांकडून 100 फी आणि 300 रूपये डिपॉझिट असे एकुण 400 रूपये प्रमाणे सुमारे 11 लाख 20 हजार रूपये घेवून फसवणूक केली आहे. दरम्यान पैश्यांचा तगादा लावूनही पैसे मिळाले नाही. याप्रकरणी निता बारी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीसात वैशाली सोळकी, भानूदास पवार यांच्यासह इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content