सावखेडा येथे महिलेचा विनयभंग; चौघांवर गुन्हा दाखल

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे २१ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील २१ वर्षीय महिला ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शनिवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास महिला घरात असतांना गावातील साईनाथ शिवाजी गोपाळ, नवनाथ शिवाजी गोपाळ, सुनिता साईनाथ गोपाळ आणि सोनाली नवनाथ यांनी महिलेचा घरात येवून महिलेला शिवीगाळ व मारहाण करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेवून चौघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी साईनाथ शिवाजी गोपाळ, नवनाथ शिवाजी गोपाळ, सुनिता साईनाथ गोपाळ आणि सोनाली नवनाथ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय माळी करीत आहे.

Protected Content