एन.ए. प्लॉटच्या खरेदी विक्रीबाबत उताऱ्यावर नोंद सुरू करा – राजेंद्र चौधरी

सावदा, प्रतिनिधी | फैजपुर उपविभाग अंतर्गत एन.ए. प्लॉटच्या खरेदी विक्रीबाबत उताऱ्यावर नोंद सुरू करण्यात यावी अशी मागणी सावदा नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, फैजपुर – सावदा परिसरात एन.ए.झालेला प्लॉटवर एक किंवा दोन व्यक्तींनी खरेदी केल्यास प्रांत विभागाकडून उताऱ्यावर नोंद घेतली जाऊ नये असे आदेश संबंधीतांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे उताऱ्यावर नोंद घेतली जात नाही आहे व याला कारण ते काही तुकडी बंदीचा शासन निर्णय आहे असे सांगतात. सदर प्रकारामुळे असंख्य गरीब नागरीक कि जे पुर्ण प्लॉट खरेदी करून घरबांधकाम करू शकत नाही. असे गरजु व्यक्ती एक प्लॉट दोन किंवा तीन व्यक्ती घेवून त्यात घरे बांधतात. उपविभागीय अधिकारी फैजपुर भाग फैजपुर यांचे मार्फत ओदशान्वये अशा नोंदी होत नाही. परिणामी तलाठी कार्यालयामध्ये असंख्य प्ररकणे प्रलंबीत आहेत. उपर नमुद नियम हा आताच लागू झालेला नाही आहे व अशा प्रकारचा निर्णय हा नागरिक क्षेत्रा करीता एन.ए. प्लॉट करीता लागू नाही असे समजते. तसेच भुसावळ व मुक्ताईनगर विभामध्ये व इतर ठिकाणी अशा प्रकराचे खरेदी विक्री व नोंदी सुध्दा सुरू आहेत.फक्त आपल्याच परिसरात म. प्रांत साहेबांच्या आदेशान्वये सुरू नाहीत. परिणामी अंसख्य गरीब कुटूंब तसेच नागरिक या प्रकारामुळे त्रस्त आहेत. तरी आपणांस विनंती करण्यात येते की एन.ए.प्लॉट जर एक किंवा अनेक व्यक्ती खरेदी करत असेल तर त्याची उताऱ्यावर नाव लावणेकामी पुर्वीप्रमाणे सुरू असलेली प्रचलीत पध्दत सुरू करण्याबाबत उपविभागीय अधिकारी फैजपुर भाग फैजपुर यांना कळविण्यात यावे.

Protected Content