राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सुचनांची संबंधित यंत्रणांनी अंमलबजावणी करावी

314 5

 

जळगाव (प्रतिनिधी) करमणूक व प्रसार माध्यमे यांच्यामध्ये सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर प्रगती होत आहे. सिनेमा, टी.व्ही वरील मालिका, पिंट मिडीया, जाहिराती व संगीत यामध्ये मागील काही वर्षात खुप मोठ्या प्रमाणात लक्षवेधी प्रगती झालेली आहे. त्यात बाल कलाकारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. बाल कलाकारांना अशा ठिकाणी काम करीत असताना संरक्षण मिळावे, ते बाल हक्कांपासून वंचित राहू नयेत, त्यांच्यावर कोणताही अन्याय होवू नये म्हणून राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने सन 2010-11 मध्ये मार्गदर्शन सूचना निर्गमित केल्या आहेत.

 

बालक ज्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे, अथवा काम करणार आहे. त्या कार्यक्रमातील घटक/ आशय बालकाच्या वयानुसार असावा. आशय फार किचकट नसावा, घटक/आशय बालकाच्या मानसिक, सामाजिक, भावनिक व शारिरीक स्थितीशी अनुरूप असावा. ज्या टी. व्ही मालिका व रिॲलिटी शोमध्ये बालक सहभागी होणार आहे, त्यात बालकाच्या वयाप्रमाणेच कामाचे तास ठरविण्यात यावेत. बालकाला ठराविक कालावधीनंतर विश्रांती मिळेल याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. या आणि अशा अनेक महत्वाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. असे विजसिंग परदेशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content