यावल महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

WhatsApp Image 2020 02 18 at 11.30.28 PM

यावल प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे हे होते.

डॉ.संध्या सोनवणे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. इतिहास विभाग प्रमुख प्रा. व्ही.बी. पाटील यांनी ‘शिवाजी महाराजांचे जीवन व कार्य’ यावर मार्गदर्शन केले की, शिवाजीराजे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांना रयतेचा राजा या नावाने संबोधले गेले. स्वराज्याची स्थापना करताना त्यांनी सर्व जातीधर्मांच्या लोकांना आपलंसं करून विश्वासात घेतले. चार प्रचंड बलाढ्य शाहींशी मुकाबला करून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. अध्यक्षीय भाषणात डॉ. संध्या सोनवणे यांनी विचार व्यक्त केले की, शिवाजीराजे सर्वांच्या लक्षात राहिले ते त्यांच्या कार्यकर्तुत्व गुणांनी आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श पिता, कुशल प्रशासक, नेतृत्वशील व उत्तम संघटक, न्यायी राजा, सर्वांना धरून चालणारा, सर्वांना समान न्याय देणारा राजा म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.एस.पी.कापडे यांनी केले, तर आभार उपप्राचार्य ए.पी. पाटील यांनी मानले. यावेळी प्रा.मनोज पाटील, प्रा.अरुण सोनवणे, प्रा.सी.के.पाटील, प्रा. राजेंद्र थिगडे, प्रा. राजू पावरा शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, अमृत पाटील, दशरथ पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content