क्राईम, राज्य

अन्य महिलेसोबतचे फोटो पाहिले म्हणून पत्नीला जिवंत पेटवले

शेअर करा !
fire
 

अहमदनगर (वृत्तसंस्था) आपल्या अनैतिक संबंधांचे फोटो पाहिले म्हणून संतापात एकाने आपल्या पत्नीला जिवंत पेटवल्याची घटना नेवासे तालुक्‍यातील मोरेचिंचोरा गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

  • advt tsh flats
  • spot sanction insta

 

या संदर्भात अधिक असे की, आरोपी पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. संबंधित महिलेसोबत पतीचे फोटो पत्नीने मोबाईलमध्ये पाहिले म्हणून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पीडित महिलेवर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.