Home क्राईम धक्कादायक : शिक्षकाकडूनच दोन विद्यार्थिनींवर अत्याचार

धक्कादायक : शिक्षकाकडूनच दोन विद्यार्थिनींवर अत्याचार

0
68


Rape Child crime
 

वर्धा (वृत्तसंस्था) वर्ध्यात एका विकृत शिक्षकाने दोन चिमुकल्या विद्यार्थीनींवरच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सतीश बजाईत असे आरोपी शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

 

आरोपी सतीश बजाईत वर्ध्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असून त्याच्याकडे शाळेच्या मुख्याध्यापक पदाचाही कार्यभार आहे. त्याने शाळेतील 2 विद्यार्थीनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. मागील तीन महिन्यापासून हा घृणास्पद प्रकार सुरु होता. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना ही बाब समजताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. नराधम शिक्षकावर 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यात एका प्रकरणात कलम 376 (अ, ब), पॉक्सो कलम 6 अंतर्गत तर दुसऱ्या प्रकरणात कलम 354 (अ) आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound