डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप गजरे

yaval

 

यावल ( प्रतिनिधी) येथील पंचशिल नगर आणि सिद्धार्थनगरच्या वतीने भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त उत्सव समिती नुकतीच गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप गजरे तर उपाध्यक्षपदी विनोद सोनवणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित साजरे करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी नुकतीच बैठक संपन्न झाली. याच वेळी उत्सव समिती गठीत करण्यात आली. या बैठकीस मोठया संख्येने आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते, समाजातील तरूण, युवक उपस्थित होते. यावल येथे भारतरत्न डॉ . बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव साजरे करण्यासाठी पंचशिलनगर व सिद्धार्थनगर येथील युवकांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप प्रकाश गजरे यांची तर उपाध्यक्षपदी विनोद मनोहर सोनवणे यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी गौतम भिमराव गजरे, खजिनदारपदी विक्की विजय गजरे, सल्लागार संतोष उमाकांत गजरे, सहसचिव बबलु अनिल गजरे यांची निवड करण्यात आली. या बैठकीस नगरसेवक मनोहर सोनवणे, रिपाईचे तालुकाध्यक्ष अरूण सुपडु गजरे, कांग्रेसचे कार्यकर्ते अनिल जंजाळे, पोलीस पाटील मिलींद गजरे, चंद्रकांत पारधे, भिमराव दतु गजरे, संजय गजरे, विलास मेढे, गौतम गजरे, रोहीत गजरे, सागर गजरे, विष्णु पारधे, निलेश तायडे, समाधान तायडे, संजय तायडे यांच्यासह आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Protected Content