पहूर, प्रतिनिधी । पहूर व जामनेर येथील डॉक्टर पिता पत्राने पहूर कसबे येथील महिलेला बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवारी घडली. दरम्यान महिलेच्या फिर्यादीवरून डॉक्टर पितापुत्रा विरूद्ध पहूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहूर कसबे गावात मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुमारास सरलाबाई भागवत तेली हि महिला घरात काम करीत असतांना डॉ.बाळकृष्ण गंगाधर कासट व डॉ.रवींद्र बालकृष्ण कासट (रा. पहूर पेठ हल्ली मुक्काम जामनेर) या दोघांनी सरलाबाईस घरातून बाहेर काढून सार्वजनिक जागेवर शिवीगाळ व मारहाण करून माझा हात पकडून हातातील बांगड्या फोडल्या. व धक्का बुक्की करून मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शेजारील रहिवासी व पं.स.चे माजी सभापती बाबुराव घोंगडे यांनी डाॅक्टर पिता पुत्रास समजविण्याचा प्रयत्न केला. परंतू तरीही डाॅक्टर कासट पिता पुत्राने महिलेस बळजबरीने हात पकडून बाहेर ओढले. या प्रकरणी सदर महिलेने पहूर पोलीस स्टेशन ला दोघांन विरूद्ध गुन्हा दाखल केला असून या मारहाणीत गळ्यातील दोन तोळे सोन्याची पोत गहाळ झाल्याचे महिलेने सांगितले आहे. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादिचे सासरे नागो दौलत तेली यांना १९९१ मध्ये ३० हजार रूपये उसनवार दिल्याचे माझे पती भागवत तेली यांना सांगितले होते. माझे सासरे वारले असल्यामुळे मला याबाबत काहीही माहिती नसले तरीही माझे पती भागवत तेली यांनी मध्यस्तानमार्फत २० हजार रूपये देण्यास तयार होते. पण डॉक्टरांनी ३० हजार मुद्दल व ३५ हजार रूपये व्याज मागितले. ही रक्कम देण्यास मी नकार दिल्याने यापुर्वी त्यांनी मला नोटीस दिली. याबाबत गावातील प्रतिष्ठित यांना माहिती दिली. डाॅक्टरांना समज दिली तरीही त्यांनी माझ्या पत्नीला मारहाण केली. धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कडे न्याय मागणार असल्याचे सांगून डॉक्टर पिता पुत्र हे अवैध सावकारी करीत असून गावातील तसेच खेड्यातील अनेक लोकांच्या तक्रारी असल्याचे फिर्यादिचे पती भागवत तेली यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्युजशी बोलताना सांगितले.