यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील बुऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावरील हिंगोणा येथे रविवारच्या रात्री झालेल्या भिषण अपघातात १२ जणांचा दुदैवी मृत्यु झाला होता. या घटेनेचे गांभीर्य लक्षात घेवुन आज दुपारच्या वेळेस घटनास्थळी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
हिंगोणा येथे झालेल्या भिषण अपघातस्थळी वरिष्ठ रस्ते राज्य मार्गाचे पोलीस अधिक्षक डॉ. डिंगबर प्रधान ठाणे मुंबई, विभागीय पोलीस अधिकारी नजीर शेख, नाशिक, पोलीस निरीक्षक धुळे बच्छाव, सहायक पोनिरीक्षक सुनिल मेढे पारधी, अफजल तडवी, गिरीष शिंदे, दत्तात्रय घाळवे यांनी पाहणी केली. या संदर्भात पत्रकारांनी घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना भेट संदर्भात माहिती विचारली असता सदरच्या घटनेचे गांर्भीय लक्षात घेता या संदर्भात अधिक माहीती घेण्याकामी आम्ही आलो असल्याचे मुंबई येथील राज्य महामार्गाचे पोलीस अधिक्षक डिंगबर प्रधान यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले . यावेळी अपघाताला कारणीभुत असलेल्या डंबर वाहनास जळालेल्या अवस्थेत क्रेनव्दारे घटनास्थाळावरून काढण्यात आले.