फैजपूरात पूरग्रस्तांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव जिल्हा रेड क्रॉस रक्तपेढी तर्फे शहरातील पूरग्रस्त भागातील रहिवासी यांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

गेल्या आठवड्यात ढगफूटी सदृश्य पाऊस झाल्याने नदी व नाल्यांना मोठा पूर आला होता. या पुराचे पाणी फैजपूर शहर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरीकांचे मोठे नुकसान झाले होते. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने जळगाव शहरातील रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने पुरग्रस्त भागातील रहिवाशींना संसारोपयोगी वस्तू व साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलग, रेडक्रोस चे डॉ उज्वला  वर्मा, माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान, तलाठी तेजस पाटील, तलाठी अजय महाजन, हेमलता सांगोळे, सामाजिक कार्यकर्ते रशीद बाबू तडवी, संजय राजपूत यांच्यासह  सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content