Home राष्ट्रीय आता ‘खून का बदला खून’ हवा; देशभरातून मागणी

आता ‘खून का बदला खून’ हवा; देशभरातून मागणी

0
41


नवी दिल्ली वृत्तसंस्था । पुलवामातील सीआरपीएफ जवानांच्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यातील शहीदांची संख्या आता ४0 झाली असून या घटनेविरूध्द देशात संतापाची लाट उसळली आहे. आता सरकारने पाकला धडा शिकवण्याची मागणी होऊ लागली आहे.

सीआरपीएफचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे जात असताना अवंतीपुरातील गोरीपोरा येथे या ताफ्याला लक्ष्य करण्यात आलं. या ताफ्यात स्फोटकांनी भरलेलं वाहन घुसवून हा स्फोट घडवून आणण्यात आला. यात आतापर्यंत ४४ जवान हुतात्मा झाले असून हा आकडा वाढण्याची भिती आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आदिल अहमद या दहशतवाद्याने हा हल्ला घडवून आणल्याची प्राथमिक माहिती आहे. आदिल हा पुलवामातील काकापोरा येथील असून २०१८ मध्ये तो जैशमध्ये सामील झाला होता अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या भयंकर हल्ल्यामुळे संपूर्ण देश स्तब्ध झाला आहे. देशभरातून याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. भारत सरकारने आता पाकला धडा शिकवण्याची गरज असल्याचा सूरदेखील आता निघू लागला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound