जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची वेबसाईट हॅक झाल्याचा प्रकार दुपारी उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून हे संकेतस्थळ पूर्ववत सुरू केले आहे.
याबाबत वृत्त असे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे http://www.nmu.ac.in हे संकेतस्थळ असून यावर आज दुपारपासून विचीत्र संदेश दिसू लागला होता. यावर भारतीयांना शिवी देण्यात आली असून ही वेबसाईट लुझीकिड यांनी हॅक केल्याचे दर्शविण्यात आले होते. दरम्यान, लाईव्ह ट्रेंडस् न्यूजच्या माध्यमातून याबाबतचे वृत्त झळकताच विद्यापीठ प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून वेबसाईट पूर्ववत सुरू केली आहे. आता विद्यापीठाचे http://www.nmu.ac.in हे संकेतस्थळ आधीप्रमाणे दिसू लागले आहे. दरम्यान, वेबसाईट हॅक प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.