जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची वेबसाईट हॅक झाल्याचा प्रकार दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे http://www.nmu.ac.in हे संकेतस्थळ असून यावर आज दुपारपासून विचीत्र संदेश दिसू लागला आहे. यावर भारतीयांना शिवी देण्यात आली असून ही वेबसाईट लुझीकिड यांनी हॅक केल्याचे दर्शविण्यात आले आहे. या संदर्भात विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण बाहेर असून याबाबत माहिती मिळाल्याचे सांगितले. तर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डी.आर. पाटील यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तोवर पोलीसात तक्रार देण्यात आल्याचे वृत्त नव्हते.