इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ : गोदावरी अभियांत्रीकीत सर्व सुविधा उपलब्ध

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आजपासून यंदाच्या अभियांत्रीकीची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असून यात विद्यार्थ्यांना आवश्यक असणार्‍या सर्व सुविधा गोदावरी अभियांत्रीकीत उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

यंदाच्या इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस आता प्रारंभ होत आहे. यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची आज अंतिम मुदत आहे. यानंतर दिनांक ७ ऑक्टोबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून १२ ऑक्टोबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. यानंतर १३ ते १५ ऑक्टोबरच्या दरम्यान पहिला; २३ ते २६ ऑक्टोबरच्या दरम्यान दुसरा तसेच २ ते ४ नोव्हेंबरच्या दरम्यान तिसरा या प्रकारे प्रवेशासाठीचे कॅप राऊंड होणार आहेत.

गोदावरी फाऊंडेशन संचलीत गोदावरी अभियांत्रीकीमध्ये विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत सुविधा प्रदान करण्यात आल्या असून यात दर्जेदार अभ्यासक्रम आणि उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांचा समावेश आहे. यासोबत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी सुविधा मिळावी या हेतूने कॉलेजमध्ये स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. येथे विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी सर्वतोपरी सुविधा प्रदान केलेली आहे.

इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी या संदर्भात कोणतीही मदत हवी असल्यास गोदावरी अभियांत्रीकीमध्ये प्रा. एम. एन. पाटील – ७५०७०७५१७१; डॉ. एन. एन. भोळे – ९३७००६००१४ अथवा प्रा. आय. एस. जाधव-७७६९०९३३०० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content