आईसह मुलाची धारदार शस्त्राने हत्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीमधील जहांगीरपुरी परिसरात एका महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

आज सकाळी शेजाऱ्यांनी फोन करुन पोलिसांना घऱातून दुर्गंध येत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता महिला आणि तिच्या मुलाचा मृतदेह पडलेला होता. मृतदेहांची अवस्था बघता हत्या करण्याआधी दोघांनाही मारहाण करण्यात आली होती. तर नंतर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली. मृतदेह पाहता दोन ते तीन दिवसांपूर्वी हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. महिलेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झालेले आहे.

Protected Content