यावल पोलीस निरीक्षक धनवाडे यांचा जनसंपर्क मोहिमेस प्रतिसाद

yawal

यावल प्रतिनिधी । येथील तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक पांनी यावलची सुत्रे स्विकारल्यापासुन आपल्या जनसंपर्क मोहीम द्वारे सर्व जातीधर्मातील नागरींकांशी थेट गाव पातळीवर भेट घेवुन संवाद साधुन त्यांच्या समस्या आणी अडीअडचणी समजुन घेत असुन त्यांच्या या मोहीमेस नागरीकांकडुन मोठा प्रतिसाद मिळत आहे.

यावल तालुका पोलीस स्टेशन येथे नुकतेच नव्याने रुजु झालेले पोलीस निरिक्षक अरुण धनवाडे यांनी आपल्या कार्याचा पदभार स्विकारल्यापासुन यावल तालुक्यातील वड्री, परसाडे, डोंगर कठोरा, डांभुर्णी, दहिगाव, किनगाव त्यासह शाळा, विद्यालयातील विद्यार्थीनींशी व विद्यार्थ्यांशी मॉर्निंग वॉक द्वारे संपर्क साधुन त्यांना कायद्या विषयक विविध विषयावर मार्गदर्शन करीत असुन, पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी आज सकाळी आपल्या संपर्क मोहीमेअंतर्गत त्यांनी किनगाव तालुका यावल येथे १५ किलोमिटर पायदळी जावुन नागरीकांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी सर्वप्रथम गावातील प्रसिद्ध मरीमाता मंदिरात जावुन देवीचे दर्शन घेवुन आपल्या संपर्क मोहीमेस सुरूवात केली. यावेळी माजी आमदार रमेश चौधरी, पं.स. माजी उपसभापती व पं.स. सदस्य उमाकांत पाटील, मयुर पाटील, सरपंच टीकाराम मुरलीधर चौधरी यांच्यासह आदी ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.

Protected Content