Home Cities जामनेर जामनेरात तेली समाज महिला मंडळातर्फे वयोवृध्द सुवासीनींचा सत्कार

जामनेरात तेली समाज महिला मंडळातर्फे वयोवृध्द सुवासीनींचा सत्कार

0
38

Jamner news 2

जामनेर प्रतिनिधी । तेली समाज महिला मंडळातर्फे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वयोवृध्द सुवासीनींचा सत्कार करण्यात आला. जेष्ठांचे आशीर्वाद हिच सौभाग्याची खरी देण असल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केल्या.

सध्याच्या काळात नौकरी किंवा व्यवसायासह अन्य कारणांमुळे विभक्त कुटूंब पध्दती रूळली आहे. त्यामुळे जेष्ठांचा सहवास दुर्लभ झाला आहे. एकत्र कुटूंब पध्दतीतीत मिळणाऱ्या सुसंस्कारांना नवीन पिढी मुकली आहे. त्यामुळे केवळ हळदी कुंकवाचा कार्यक्रम न करता येथील संताजी जगनाळे महाराज महिला मंडळातर्फे सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. शोभाबाई चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार २१ रोजी येथील जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात गयाबाई चौधरी, भिकुबाई चौधरी, धनाबाई चौधरी, लिलाबाई चौधरी, सुलोचना चौधरी या पाच जेष्ठ सुवासीनींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नेहमीच्या दगदगीला फाटा देत विरंगूळा म्हणून काही खेळही खेळण्यात आले. खेळामधील विजेत्यांना प्रतीभा चौधरी यांचेतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. सुत्रसंचलन मनिषा चौधरी, कार्यक्रमाची प्रस्तावना प्रतीभा चौधरी तर आभार प्रदर्शन प्रणाली चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजाच्या सर्व महिलांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound