किरण मराठे याने वेट लिफ्टिंग स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

raver news 1

रावेर, प्रतिनिधी | आसाम गुवाहाटी येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया खेलो’ स्पर्धेत वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारात आचार्य गरुड विद्यालय शेंदुर्णी येथील विद्यार्थी किरण रवींद्र मराठे याने ७३ किलो वजनी गटात २५१ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आहे. राष्ट्रीय स्तरावर सलग दुसरे पदक पटकावून त्याने मोठे यश संपादन केले आहे.

 

हा खेळाडू हा प्रशिक्षक अजय महाजन यांच्या मार्गदर्शनात व्ही.एस. नाईक महाविद्यालयातील जिमखाना येथे सराव करतो व आचार्य गरुड विद्यालय शेंदुर्णी येथे शिक्षण घेतो. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सागरमल जैन, दीपक गरुड, प्राचार्य डॉ.वी आर पाटील क्रीडा शिक्षक आर.जे. पाटील, वी.एस. नाईक महाविद्यालयाचे चेअरमन हेमंत नाईक, प्राचार्य डॉ.पी.वी दलाल, क्रीडा शिक्षक उमेश पाटील, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप मीसार, संजय मीसार, राजेश शिंदे, आमोद महाजन, प्रकाश बेलास्कार, यशवंत महाजन, नाना महाजन, आधुनिक व्यायाम शाळेचे अध्यक्ष संदीप महाजन, भूषण महाजन, लखन महाजन, अविनाश पाटील, नितीन महाजन यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Protected Content