Home Cities पारोळा पारोळा येथून सकाळी हिरापूर बस सुरु करण्याची मागणी

पारोळा येथून सकाळी हिरापूर बस सुरु करण्याची मागणी

0
111

parola nivedan

पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील हिरापूर येथे सकाळी ६.०० वाजता बस सुरू होणेबाबत येथील आगारप्रमुख यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना जळगाव यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे.

 

या निवेदनात म्हटले आहे की, हिरापूर येथे सकाळी ६.०० वाजता शाळेत जाण्यासाठी ४० ते ५० विद्यार्थी असतात. सकाळची बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे फाट्यापर्यंत पायी चालत जावे लागते म्हणून सकाळी ६.०० वाजता बस सुरू व्हावी, यासाठी आगार प्रमुखांना निवेदन देण्यात देण्यात आले. बस सुरू न झाल्यास बस अडवून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आलेला आहे. निवेदन देतांना स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, जितेंद्र पाटील, भैय्या पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound