बोदवड शहरात सैन्य भरतीसाठी विनामूल्य नोटरी सेवा

WhatsApp Image 2020 01 11 at 9.36.00 PM

बोदवड, प्रतिनिधी | येथील ॲड.अर्जुन पाटील यांची नुकतीच भारत सरकार नोटरी पदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे बोदवड तालुक्यातील व परिसरातील लोकांना ॲड. अर्जुन पाटील यांचे मार्फत नोटरीची सेवा बोदवड शहरातच उपलब्ध झाल्याने त्याचा फायदा बोदवड तालुक्यात व परिसरातील लोकांसह सैन्यभरती विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येत आहे.

बोदवड शहरात नोटरीची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे सैन्य भरतीच्या विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. सैन्य भरतीसाठी फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना फॉर्मवर नोटरी शपथपत्र करावे लागत असते. परंतु, सैन्यात भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती आपलेही सामाजिक कर्तव्य आहे या उदार भावनेतून अॅड. पाटील, यांनी आपली नोटरीची सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे. यासेवेचा सैन्यभरतीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी भरलेले संपूर्ण फार्मचे तपासणी केली जाते.  अॅड. पाटील यांना बोदवड तालुक्याकरीता बोदवड तालुक्यातील पहिली नोटरी मिळाली आहे. त्यांनी पुढील वेळेस विद्यार्थ्यांना त्यांचे फॉर्म भरणे, प्रिंटिंग करून देणे त्याचेळेस नोटरी करुन देणे, त्यांना नॉन जुडिशिअल स्टॅम्प उपलब्ध करून देणे, तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली भरती पूर्व प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना मैदानी सराव या सर्व सेवा व सुविधा एकाच दालनातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही त्यांचा राहणार असून त्यांच्या फॉर्म प्रिंटिंग करून ती ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.अॅड. पाटील हे यापूर्वी स्टडी सर्कल एमपीएससी,यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे जळगाव शाखेचे केंद्रप्रमुख सुध्दा राहून गेल्याने त्यांच्या ज्ञानाचा फायदा तालुक्यातील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी होणार आहे. ते लवकरच दर रविवारी विनामूल्य संडे बॅच सुरू करणार आहेत. या कार्यामुळे सैनिक भरतीस जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढणार आहे असे मत त्यांनी यावेळी बोलतांना मांडले. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल विद्यार्थी वर्ग, व्यापारी वर्ग असोसिएशन, बँकिंग असोसिएशन सर्व कार्यालयातील सरकारी कर्मचारी यांच्याकडून अॅड.पाटील यांचे कौतुक केले जात आहे.

Protected Content