कजगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

kajgaon

 

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कजगाव येथे एका तरूणाने स्वतःच्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना (दि.११) रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, कजगाव येथील भास्कर नगर मधील शोएब मुस्ताक तांबोळी (वय-२५) या तरूणाने घरातील किचन रूम मधील पंख्याच्या कडीला दोरफास लावुन आत्महत्या केली. शोएब हा (दि.११) रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान गावातील एक मिञ सोबत गावी जाणार होते. परंतु यासाठी मयत शोएब तांबोळी याला फोन केला असता तो रिसिव्ह करित नाही म्हणून मित्र घरी आला. मित्रांने आवाज देऊन प्रतिसाद मिळत नाही तर म्हणून दुस-या दरवाजाच्या सहाय्याने आत प्रवेश केला असता मयत शोएब तांबोळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अवस्थेत आढळून आला. यावेळी पत्नी आपल्या माहेरी व आई धुळे येथील नातेवाईकांकडे गेल्या असल्याने कुटूंबातील एकही सदस्य घरी नव्हते.

याबाबत पोलीस पाटील राहूल पाटील यांच्या खबरी वरून भडगाव पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ जिजाबराव पवार हे करीत आहे. तरी या आत्महत्या मागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

Protected Content