
धरणगाव (प्रतिनिधी) येथील नूतन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भगवान भादु महाजन यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी धरणगावातील उद्योगपती सुरेश नाना चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, संचालक धिरेद्र पुरभे, किशोर बापू धनगर, शैलेश चंदेल, मनोज कंखरे, सुदाम मराठे, प्रल्हाद बाबूराव पाटील, राजेंद्र महाजन, रामभाऊ महाजन, कांतीलाल माळी, कन्हैया रायपूरकर, दिलीप माळी, परमेश्वर महाजन, संस्थेचे सचिव परिहार आप्पा यांच्यासह संस्थेचे सर्व कर्मचारी व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.