मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | १५ सप्टेंबर रविवार रोजी महाराष्ट्र शासन कौशल्य उद्योजकता रोजगार आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उचंदे येथे संविधान मंदिर उद्घाटन सोहळा आभासी पद्धतीने उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उचंदा येथे लोकार्पण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आयएमसी सदस्य पुरुषोत्तम वंजारी सर यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना संविधान विषयी प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ. अ.फ.भालेराव सर यांनी माहिती दिली. प्रशांतराव तायडे सर यांनी संविधान निर्मिती प्रक्रिया व संविधानातील संसदीय घटनात्मक कार्यकारी मंडळ, विधिमंडळ व संविधानात्मक न्यायपालिका याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. बी. तायडे सर यांनी विद्यार्थ्यांना भारतीय नागरिकांचे कर्तव्य व शैक्षणिक हक्क याविषयी समाजात असणारी विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत कसे करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रशांतराव तायडे, पुरुषोत्तम वंजारी सर, डॉ. अ.फ. भालेराव, सुमीर इंगळे, पवन बावस्कर, अशोक पाटील, संजय पाटील, योगेश भारसाके, सुरेश बडगुजर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पवन बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.