खामगाव प्रतिनिधी । शहरांतर्गत येणाऱ्या छोट्या मोठ्या गावांमध्ये वीज चोरीचे प्रमाण वाढत असून येथील महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून मागील आठ महिन्यात तब्बल 14 लाख 31 हजार रुपयांची वीज चोरी चोरी उघडकीस आली आहे. 30 वीज चोरांवर महावितरणने कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वीज चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतू अलीकडे बहुतांश ग्राहकांकडून वीज बिल कमी करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवून वीज चोरी केल्या जात असल्याचे वारंवार समोर आले. त्यामुळे वीज चोरीच्या घटना वाढत चालत आहे. मीटरमध्ये छेडकांनी करणे, त्याचा विविध प्रकारे केला जात आहे. येथील महावितरणकडून मागील एप्रिल ते नोव्हेंबर मध्ये 30 वीज चोरी पकडण्यात आले आहेत. यामध्ये 23 वीज चोरांनी 14 लाख 63 हजार दंड भरला 7 वीज चोरांना वर पोलिस तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रमोद हेलोडे यांनी दिली आहे. शहरातील नांदुरा रोड शंकर नगर या भागात ही चोरी पकडण्यात आले आहेत. वीज चोरीचे असे प्रकार असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी लाईव्ह ट्रेन्ड न्युजशी बोलताना सांगितले आहे.